राशीन दुर्घटनेनंतर हडपसर धोक्यात? जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार?

Rokhthok Maharashtra 2 0

अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन गावात रविवारी रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एक मोठे लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर पुण्यातील हडपसर परिसरातील धोकादायक होर्डिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रामटेकडी, ससाणेनगर, सोलापूर रोड, माळवाडी, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, मांजरी आणि शेवाळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या होर्डिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, अनेक होर्डिंग नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी रहिवासी भागातही अवाढव्य लोखंडी संरचना उभ्या करण्यात आल्या असून त्यांची सुरक्षितता तपासली जात नसल्याचा आरोप आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत असताना या होर्डिंगमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच नियमबाह्य आणि बेकायदा होर्डिंग तात्काळ हटवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रश्न असा आहे की, आणखी एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?

https://youtu.be/wpiRpti8MMA

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.