जामिनावर बाहेर आला अन् 2 दिवसांतच हत्या! शिरूरमध्ये सराईत गुन्हेगारावर गोळीबार, दगडाने ठेचून खून

Rokhthok Maharashtra 1 0

“पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे.
करडे घाट परिसरात सराईत गुन्हेगार विशाल काळे याची गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक महेंद्र मल्लाव हत्याकांडातील आरोपी विशाल काळे आणि सनी यादव यांना नुकताच जामीन मिळाला होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच दोघांची समोरासमोर भेट झाली.
वाहनांची धडक झाल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले. आरोपी सनी यादव याने विशाल काळेवर चार राऊंड गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्य आरोपी सनी यादव फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
याचवेळी बारामतीच्या माळेगाव परिसरात अवैध दारू व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.