इंदापूर सत्र न्यायालयाकडून पोक्सो प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर
पुणे, ३१ ऑक्टोबर २०२६. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पोक्सो प्रकरणातील आरोपीस इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नियमित जामीन मंजूर केला.
आरोपी मे २०२६ पासून कोठडीत होता. तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले असल्याने पुढील कोठडीची गरज नाही, पीडितेने जामिनास विरोध केला नाही आणि आरोपीस कोणताही गुन्हेगारी पूर्वेतिहास नाही, याची न्यायालयाने दखल घेतली. एफआयआर, वैद्यकीय अहवाल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे यांतील बाबी जामिनाच्या टप्प्यावर आरोपीच्या बाजूने असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
५०,००० रुपयांच्या वैयक्तिक व जामीन बाँडवर आरोपीची मुक्तता करण्यात आली असून, पुराव्यांशी छेडछाड न करणे आणि खटला संपेपर्यंत पीडितेशी संपर्क न साधणे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
आरोपीतर्फे ॲड. मृण्य जाधव, ॲड. मिताली मळेकर , ॲड. राजेश राठोड आणि ॲड. धनंजय भोसले यांनी काम पाहिले.





