दिवाळीच्या सफाईत घरातून या ३ गोष्टी आजच काढा! वास्तुशास्त्र काय सांगतं? |

Rokhthok Maharashtra 11 0

दिवाळीची साफसफाई करताय? मग घरातील या ३ गोष्टी आजच बाहेर काढा! अन्यथा वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मकता राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. नेमक्या कोणत्या आहेत या गोष्टी? जाणून घ्या…
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, घरोघरी साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीत देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याची परंपरा आहे. मात्र साफसफाई करताना केवळ धूळ आणि जाळी काढून चालणार नाही, तर काही जुन्या वस्तूंचीही विल्हेवाट लावणं महत्त्वाचं मानलं जातं.
पहिली गोष्ट म्हणजे बंद पडलेली घड्याळं! वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ प्रगतीतील अडथळ्यांचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे ती दुरुस्त करा किंवा निरुपयोगी असल्यास बाहेर काढा.
दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या आणि फाटलेल्या चपला-बूट! अनेक दिवसांपासून पडून असलेल्या खराब चपला घरात साठवून ठेवू नका. वापरण्यायोग्य चपला गरजू व्यक्तींना द्या.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेला किंवा खराब झालेला झाडू! धार्मिक श्रद्धेनुसार झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे खराब झाडूची योग्य विल्हेवाट लावा.

आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेला किंवा खराब झालेला झाडू! धार्मिक श्रद्धेनुसार झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे खराब झाडूची योग्य विल्हेवाट लावा.
मात्र लक्षात ठेवा, या वास्तुशास्त्राशी आणि धार्मिक श्रद्धांशी संबंधित समजुती आहेत.
यंदाच्या दिवाळीत घराची सफाई करताना या गोष्टींकडेही लक्ष द्या आणि आनंदाने करा लक्ष्मीपूजन!

 

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.