छत्रपती संभाजीनगर हादरले! 80 वर्षीय वृद्ध महिलेवरील अत्याचारप्रकरणी तरुण अटकेत

Rokhthok Maharashtra 1 0

“छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
पैठण तालुक्यातील पाचोड येथे 80 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी वृद्ध महिला अडचणीत असताना आरोपीने मदतीचे आश्वासन देत त्यांना आपल्या घरी नेले. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
महिलेच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. यानंतर पीडित महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.