लोणेरे हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अनिस मुंबईतून अटक |

Rokhthok Maharashtra 15 0

रायगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या लोणेरे हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. रायगड पोलिसांनी मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला मुंबई आणि ठाणे परिसरातून अटक केली आहे.
२१ एप्रिल रोजी लोणेरे येथील ‘ओमकार लॉज’मध्ये तरुणीचा निर्वस्त्र मृतदेह आढळून मोठी खळबळ उडाली होती. तपासात मृत तरुणी पल्लवी मोरे असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपीला पकडलं. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.