वकीलांसह नाशिककडे रवाना; रुपाली चाकणकरांच्या चौकशीकडे राज्याचे लक्ष

Rokhthok Maharashtra 10 0

भोंदू अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज एसआयटी चौकशीसाठी नाशिकमध्ये हजर होणार आहेत.

खरात प्रकरणात विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांची चौकशी करण्याची मागणीही जोर धरत होती.

ताज्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून त्यांच्या सोबत वकीलही असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, भोंदू अशोक खरात याला शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन लाटल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.

तर दुसरीकडे, खरातची पत्नी कल्पना खरात गेल्या सव्वा महिन्यापासून फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

आता एसआयटी चौकशीत आणखी कोणते खुलासे होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.