संभाजीनगर हादरलं! घरात घुसून महिलेची हत्या

Rokhthok Maharashtra 10 0

“छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांड समोर आलं आहे.
बजाजनगर परिसरात भरदिवसा एका महिलेनं घरात घुसून दुसऱ्या महिलेची हत्या केली.

मृत महिला साधना सोनपेटकर असून, आरोपी शैला सोनार ही तिच्या पतीची जुनी मैत्रीण असल्याची माहिती आहे.
जुन्या वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

आज सकाळी शैला ही पिस्तूल आणि चाकू घेऊन साधना यांच्या घरात घुसली.
यावेळी घरात साधना आणि त्यांची वयोवृद्ध आजी उपस्थित होत्या.

वाद वाढत असताना शैलाने पिस्तूल रोखलं, मात्र आजींनी धाडस दाखवत ते हिसकावून खिडकीबाहेर फेकलं.
तरीही आरोपीने चाकूने हल्ला करत साधना यांना गंभीर जखमी केलं, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर शैलाने स्वतःला घरात कोंडून घेतलं, मात्र पोलिसांनी दरवाजा तोडून तिला ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, परिसरात संतापाचं वातावरण आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.