स्कूल बसवर झाड कोसळलं; 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा दुर्दैवी मृत्यू, चेंबूर हादरलं

Rokhthok Maharashtra 11 0

 

मुंबईतील चेंबूरमध्ये एका निष्पाप चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या ११ वर्षीय विहान श्रीवास्तववर अचानक झाड कोसळले आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.
स्क्रिप्ट :
चेंबूरमधील ११व्या गल्लीत युनिव्हर्सल हायस्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी थांबली होती. त्याच वेळी मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतचा मोठा पिंपळाचा वृक्ष बसवर कोसळला. या भीषण अपघातात ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला, तर इतर विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांनी बसच्या काचा फोडून सुरक्षित बाहेर काढले.
घटना घडली तेव्हा विहानची आई ऑफिसमध्ये होती. अचानक आलेल्या फोनने त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. विहान हा अभ्यासात हुशार, खेळकर आणि शाळेच्या क्रीडा संघातील सक्रिय विद्यार्थी असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, या दुर्घटनेनंतर परिसरातील धोकादायक झाडांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.