प्रेम, धर्मांतराची अट आणि 19 वर्षीय दुर्वांकचा मृत्यू; पोलिसांकडून सोशल मीडिया तपास सुरू

Rokhthok Maharashtra 2 0

सांगलीतून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रेम, लग्न आणि धर्मांतराच्या वादातून अवघ्या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
स्क्रिप्ट :
सांगलीच्या खणभाग परिसरातील दुर्वांक शेवाळे हा पुण्यात नोकरी करत होता. कोल्हापूरच्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते आणि दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, लग्नासाठी तरुणीने धर्मांतराची अट घातल्याचा आरोप दुर्वांकच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दुर्वांकच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवरील काही चॅट आढळून आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला असून, त्यामध्ये धर्म बदलण्याबाबतचा संवाद असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर दुर्वांक मानसिक तणावात होता आणि अखेर त्याने राहत्या घरी आत्महत्या केली.
कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिला मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावरील माहिती मागवण्यात आली असून, तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष निश्चित मानता येणार नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.