हडपसरमध्ये दुचाकी रस्ता बंद; वाहतूक कोंडीवरून नागरिक आक्रमक

Rokhthok Maharashtra 21 0

पुण्यातील हडपसर परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
त्यातच वाहतूक पोलिसांच्या नव्या प्रयोगामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.
हडपसरच्या ऐतिहासिक वेशीतून स्थानिक व्यापारी, कामगार, रहिवासी आणि दुचाकीस्वार दररोज ये-जा करत असतात. मात्र, वाहतूक पोलिसांनी या मार्गावर बॅरिकेट्स लावून दुचाकींसाठीचा रस्ता बंद केला आहे.
यामुळे नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून मोठी गैरसोय होत आहे.

 

स्थानिकांच्या मते, आधीच अतिक्रमण, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यातच पोलिसांच्या या नव्या निर्णयामुळे गोंधळात आणखी भर पडली आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, वाहतूक पोलीस कोंडी सोडवण्यापेक्षा पावत्या फाडण्यात जास्त व्यस्त असतात. त्यातच वाहन चालकांना लांबचा फेरा पडतो इंधन बचतीचा सल्ला मोडीत निघाला आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाविरोधात नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.