राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या दौऱ्याने नाशिकमध्ये कामांचा धडाका; नागरिकांचा सवाल!
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमासाठी भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे.
राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, परिसराचे सुशोभीकरण आणि नागरी सुविधांची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. कमी कालावधीत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मात्र, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील कामांना गती मिळत असताना सामान्य नागरिकांचा सवालही महत्त्वाचा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी कामे वेगाने होतात, मग नागरिकांच्या रोजच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून अशीच तत्परता का दाखवली जात नाही?
रस्ते, स्वच्छतागृहे, वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेचे प्रश्न कायमस्वरूपी सुटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू असलेली कामे केवळ दौऱ्यापुरती मर्यादित न राहता नाशिककरांना कायमस्वरूपी दिलासा देणारी ठरावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाशिकमधून प्रतिनिधी अमर पठारे, रोकठोक महाराष्ट्र!





