सतीश चव्हाणांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीत खळबळ!
सतीश चव्हाण यांचा पराभव… आणि आता विक्रम काळेंची धडधड वाढली! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुण्याची जागा भाजपला सोडावी लागली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे तीन टर्मचे आमदार सतीश चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
या निकालामुळे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर आणि नेतृत्वाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पक्षांतर्गत संवादाचा अभाव आणि उमेदवारीबाबत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मात्र, या पराभवाची धास्ती आता शिक्षक आमदार विक्रम काळे यांनाही बसणार का? कारण आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा मतदारांना सामोरे जावे लागणार आहे.
सतीश चव्हाण यांच्याप्रमाणे विक्रम काळे यांच्याविरोधातही नाराजी असल्याचे दावे केले जात आहेत.
त्यामुळे मराठवाड्यात राष्ट्रवादीची ताकद टिकणार की पक्षाला आणखी एका राजकीय आव्हानाचा सामना करावा लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





