दादा कोंडकेंच्या मृत्यूचा काळीज पिळवटणारा किस्सा! रुग्णवाहिका मिळाली नाही, मांडीवर ठेवून मृतदेह घरी आणला!
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या दादा कोंडकेंचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायी होता! मृत्यूनंतर रुग्णवाहिकाही मिळाली नाही… अखेर दादांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या कॉन्टेसा गाडीत मांडीवर घेऊन घरी न्यावा लागला.
अभिनेते दादा कोंडके यांच्या निधनाचा हा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.
अनिता पाध्ये यांच्या म्हणण्यानुसार, रात्री २ वाजून ४५ मिनिटांनी दादांचे मॅनेजर जितूभाई यांचा फोन आला. दादांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात नेले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दादांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे आणि त्यांचे दहा मिनिटांपूर्वीच निधन झाल्याचे सांगितले.
मात्र, सर्वात धक्कादायक प्रसंग पुढे घडला. दादांचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली, पण कागदपत्रे आणि इतर कारणांमुळे ती उपलब्ध झाली नाही.
अखेर दादांच्या मित्रांसोबत अनिता पाध्ये यांनी स्वतःच्या मांडीवर दादांचा मृतदेह ठेवून त्यांच्या कॉन्टेसा गाडीतून घरी आणला.
आयुष्यभर महाराष्ट्राला हसवणाऱ्या दादांच्या आयुष्यातील हा शेवटचा प्रसंग आजही अनेकांच्या मनाला चटका लावणारा आहे!





