“१७४८ बदली सेवक होणार कायम, अजितदादांचा महत्त्वपूर्ण निर्णय – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश”

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे (प्रतिनिधी )
पुणे परिवहन महामंडळातील सर्व कामगारांना सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम मिळावी तसेच त्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा व्हावी यासाठी बैठक घेण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे सातत्याने पाठपुरावा करत होतो. ही बैठक आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथे संपन्न झाली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले.

 

आज झालेल्या बैठकीमध्ये कामगारांचा प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचा फरक (चार-४) समान हप्त्यात देण्याचे धोरण ठरले आहे. पहिला हप्ता चालू महिन्यातच तातडीने देण्याचे आदेश अजित पवार यांनी आज दोन्ही आयुक्तांना दिले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून बदली, रोजंदारी, हंगामी सेवक म्हणून काम करणारे कामगार कायम होण्याची मागणी करत होते. त्यावर तोडगा काढत या विषयात उच्च न्यायालयच्या आदेशाप्रमाणे ज्या सेवकांची २४० दिवस हजेरी भरलेली आहे, अशा १७४८ बदली सेवाकांना तातडीने कायम करण्याचे आदेश अजितदादांनी दिले आहेत. लवकरच याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

सदरील बैठकीसाठी पुणे परिवहन महामंडळाच्या सी.एम.डी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, कामगार प्रतिनिधी नुरुद्दीन इनामदार, राजेंद्र कोंडे, हरीश ओहळ, राहुल कुटे, उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.