५ दिवस, सतत फोन आणि मानसिक दबाव…८२ वर्षांच्या आजींना मोठी फसवणूक

Rokhthok Maharashtra 14 0

कल्याणमध्ये एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

८२ वर्षांच्या एका वृद्ध महिलेला “डिजिटल अरेस्ट”चा धाक दाखवून तब्बल ७३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

सायबर गुन्हेगारांनी स्वतःला तपास अधिकारी असल्याचं सांगत महिलेला फोन केला. “पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे तुमचा नंबर आहे” असं सांगून त्यांना प्रचंड घाबरवलं.

यानंतर ५ दिवस सतत फोन करून मानसिक दबाव टाकण्यात आला आणि बँक व्यवहार तपासणीच्या नावाखाली RTGS आणि ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे पैसे घेतले.

ही घटना ६ ते १० एप्रिल दरम्यान घडली असून, अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

सध्या कल्याण महात्मा फुले पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

👉 अशा प्रकारच्या फोन कॉल्सपासून सावध रहा. कोणालाही OTP, बँक डिटेल्स किंवा पैसे देऊ नका.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.