अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत लग्नाची मागणी करणाऱ्यावर गुन्हा लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद

Rokhthok Maharashtra 37 0

पुणे : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी घालून आईला धमकावणाऱ्यावर २० वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस थोरात (वय २०, रा. आदर्श नगर, देवाची उरुळी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी देवाची येथील १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी (दि. २० मार्च) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मागील पंधरा दिवसांपासून ते 8 मार्च या कालावधीत उरुळी देवाची येथे घडला आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फिर्य़ादी यांच्या १७ वर्षाच्या मुलीचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिला लग्नाची मागणी घातली. याबाबत फिर्यादी यांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला समजून सांगितले. मात्र, आरोपीने मुलीचा पाठलाग करणे सुरुच ठेवले. मुलीचा घरापर्यंत पाठलाग करुन तिला मानसिक त्रास दिला. आरोपीने फिर्यादी यांना मी तुमच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. तिचे जर दुसरीकडे लग्ने केले तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.