उत्तूर घाटात भीषण अपघात! जेसीबीने काढले मृतदेह पसार चालक अखेर ताब्यात

Rokhthok Maharashtra 1 0

कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर घाटात झालेल्या भीषण अपघाताचा घटनाक्रम आता समोर आला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
आजरा-उत्तूर मार्गावरील मुमेवाडी घाटात भरधाव टेम्पोचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि काही मृतदेह टेम्पोखाली अडकले होते.
परिस्थितीची भीषणता लक्षात घेता पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर चारही मृतदेह उत्तूर येथील शववाहिकेतून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवत घाट परिसरातून त्याला ताब्यात घेतले. प्रेम रामदास चंदर, वय 24, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.