कोल्हापूर हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीची भररस्त्यात कोयत्याने हत्या | आरोपी पती अटकेत

Rokhthok Maharashtra 1 0

कोल्हापूर हादरलं! प्रेमविवाह केलेल्या पत्नीची भररस्त्यात कोयत्याने निर्घृण हत्या… आणि त्यानंतर आरोपी पतीचं धक्कादायक वर्तन पाहून सर्वजण हादरले.
पेठवडगाव येथे अमृता दीपक कांबळे या ३० वर्षीय महिलेची तिच्याच पतीने भररस्त्यात हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी दीपक कांबळे याला अटक केली आहे.
माहितीनुसार, पत्नी एका कॉम्प्लेक्समध्ये कायदेशीर सल्ल्यासाठी गेली होती. त्याची माहिती मिळताच आरोपी हातात कोयता घेऊन बाहेर दबा धरून बसला. पत्नी बाहेर येताच दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने भररस्त्यात कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.
घटनास्थळी उपस्थित नागरिक मदतीसाठी धावले. मात्र आरोपीने हातातील कोयता दाखवत त्यांना दूर राहण्याची धमकी दिली. गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून हत्येमागील नेमकं कारण आणि सर्व परिस्थितीचा तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.