गृहखात्याचा ‘यू-टर्न’! आमदाराच्या जावयाची बदली ५ दिवसांत रद्द

Rokhthok Maharashtra 1 0

राज्याच्या गृह विभागातील बदल्यांचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कारण, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बदली अवघ्या पाच दिवसांत रद्द करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचे जावई अमोल झेंडे यांची २१ मे रोजी मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात बदली करण्यात आली होती.
मात्र, अवघ्या पाच दिवसांतच ही बदली रद्द करून त्यांना पुन्हा पुण्यातील पीएमआरडीएमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राजकीय दबावामुळेच ही सुपरफास्ट बदली रद्द झाल्याचा आरोप केला जात आहे.
अमोल झेंडे यांच्या कुटुंबाचे विविध पक्षांतील मजबूत राजकीय संबंध असल्याचीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, ठाण्याचे डीसीपी अमरसिंह जाधव यांची बदलीही रद्द करण्यात आली आहे.
एकीकडे राज्यात कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने वाढत असताना, गृह विभाग मात्र बदल्या आणि त्या रद्द करण्याच्या ‘म्युझिकल चेअर’मध्ये व्यस्त असल्याची टीका आता होत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, राजकीय हस्तक्षेप किती वाढला आहे यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.