“जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आंदोलन – संदीप लहाने

Rokhthok Maharashtra 1 0

वाराणसी या ठिकाणी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना जाहीर प्रचार सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरे टोप घालून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. छत्रपती शिवरायांचा जिरे टोप म्हणजे हे कोणालाही सत्कारात डोक्यावर चढवण्यासाठी नसतो, हा छत्रपती शिवरायांचा अत्यंत सर्वोच्च मानला जाणारा टोप असतो, आणि त्यांनी जिरे टोप हा सत्कार करण्यासाठी त्या ठिकाणी वापरला आहे त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध त्यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संदीप लहाने यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राचे ते भूषण आहेत अशा महापुरुषाचा जाणून-बुजून अवमान करणे आम्ही खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप म्हणजे सर्वोच्च सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला राज तिलक झाला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने राजे झाले त्याचेच प्रतीक म्हणून शिरावरती जो राजमुकुट ठेवण्यात आला तो मुकुट म्हणजे जिरेटोप आहे , आज तागायत या टोपाचा राजकीय वापर कुठेच केला गेला नव्हता एवढेच काय त्यांचे थेट वंशज असणारे उदयन महाराज भोसले सातारा गादी किंवा छत्रपती युवराज संभाजी राजे कोल्हापूर गादी यांनी सुद्धा आजतगायत हा जिरेटोप आपल्या डोक्यात घातला नाही. मग हे प्रफुल पटेल कोण लागून गेलेत की ज्यांनी तो जिरे टोप नरेंद्र मोदी यांना घातला.

लाखो मावळ्यांनी जेव्हा आपल्या प्राणांची आहूती दिली आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या सर्व मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्य निर्माण झाले. म्हणून सर्वांच्या त्यागाचे शौर्याचे प्रतीक तो राजमुकुट म्हणजेच जिरे टोप आहे. कोणीही कुठेही याचा गैरवापर करू नये. असे करणे म्हणजे एक प्रकारचा राजद्रोहच आहे. एवढं साधं गणित सुद्धा न समजण्या इतपत प्रफुल्ल पटेल काही वेडे नाहीत.. मला असं वाटतंय की हा जो प्रकार घडला आहे तो जाणून बुजून केलेला प्रकार असावा.
म्हणून प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्रातील जनतेची शिवप्रेमींची मावळ्यांची जाहीर माफी मागावी.
अन्यथा मराठा टायगर फोर्स प्रफुल पटेल यांच्या विरोधात महाराष्ट्राभर रस्त्यावर उतरून आंदोलन करनार, त्यांनी माफी मागितल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा इशारा संदीप लहाने पाटील यांनी दिला आहे.
यावेळी मराठा टायगर फोर्स चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.