“पार्थ चुकलास!” रोहित पवारांचा थेट सल्ला 🔥 काँग्रेस संपली म्हणणं चुकीचं – रोहित पवारांचा टोला

Rokhthok Maharashtra 2 0

नमस्कार! बारामती पोटनिवडणुकीतून एक मोठा राजकीय वाद समोर आला आहे. राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसचा महाराष्ट्रात “डाऊनफॉल सुरू आहे” असे वक्तव्य केल्यानंतर राजकारण तापलं आहे. या वक्तव्यावर आता त्यांचेच बंधू आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत पार्थ यांना सल्ला दिला आहे.

 

रोहित पवार म्हणाले, “राजकारणात सत्तेत असो किंवा विरोधात, जमिनीवर राहणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही पक्ष कधी संपत नाही. दुसऱ्या पक्षाबद्दल बोलताना तो संपला म्हणणं योग्य नाही.”तसेच त्यांनी पार्थ यांचे विधान घाईगडबडीत झाल्याचंही म्हटलं.

दरम्यान, शरद पवार यांनीही “अशा विधानांसाठी परिपक्वता लागते” असा टोला लगावला, तर सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली.या सर्व घडामोडींमुळे बारामतीची निवडणूक आता अधिकच चर्चेत आली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.