पीएमपी बसचालकाने सहकाऱ्याच्या कानाचा तोडला लचका

Rokhthok Maharashtra 1 0

भेकराईनगर आगारामधील घटना ः
पुणे, दि. 22 : बस बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन पीएमपीएमएल’ बसचालकाने सहकाऱ्याला शिवीगाळ करून कानाचा लचका तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रदीप आण्णासो सुतार (वय-41 रा. काळेवाडी, ता. पुरंधर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कोरे नावाच्या बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील भेकराईनगर आगारामध्ये मंगळवारी (दि.19) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी भेकराईनगर आगारामध्ये काम करीत आहेत. मंगळवारी रात्री फर्यादी सुतार हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी त्यांनी आरोपीला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने कोरे याने फिर्यादी यांना शिवागाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच सुतार यांच्या कानाचा चावा घेऊन कानाची पाळी तोडली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.