पुण्यात IT Job Scam उघड! नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.
खराडीतील रेडियंट एडटेक LLP आणि संबंधित कंपन्यांविरोधात अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
पीडितांच्या आरोपानुसार, प्लेसमेंट फी, ट्रेनिंग फी आणि नोकरी हमीच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात आले. काहींना सुरुवातीला नोकरी देऊन काही महिन्यांचा पगारही देण्यात आला, मात्र त्यानंतर पगार बंद करून नोकरीचे आश्वासन फोल ठरले.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांनी विद्यार्थ्यांना एकत्र आणत थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदन दिलं.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सैफ मणियारला अटक केली असून, कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घोटाळ्यात तब्बल ७०० ते ८०० तरुणांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.