फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ८ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

Rokhthok Maharashtra 1 0

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या बदल्यांमध्ये रुपेश जयवंशी यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातून महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.
श्रीधर दुबे यांची राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात NRLM चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निलेश सागर यांची पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे.
जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती झाली असून, वर्षा लड्डा यांची पुण्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
डॉ. मंगेश गोंदवले यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
पंकज देवरे यांची एमएमआरडीएमध्ये सह महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे.
तर डॉ. मंजिरी मानोलकर यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.