फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय 2 लाखांपर्यंत कर्जमाफी नियमात मोठा बदल!

Rokhthok Maharashtra 2 0

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मोठी बातमी समोर आली आहे.

फडणवीस सरकारने जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नव्याने मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये नियमांत मोठा बदल करत शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन लाखांपर्यंत पीक कर्जमाफी जाहीर केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जावर ही माफी लागू होणार आहे.
तसंच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या महापुरामुळे राज्यातील 20 हून अधिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यावरून नाराजी व्यक्त होत असताना आता सरकारने नव्या निर्णयाने दिलासा दिला आहे.

महत्त्वाचा बदल म्हणजे—
आता मदतीसाठी असलेली मर्यादा शिथिल करण्यात आली आहे.

➡️ पूर्वी मर्यादित जनावरांवर मदत मिळत होती,
पण आता मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र असतील.

➡️ अल्प व अत्यल्प भूधारकांपुरते मर्यादित न ठेवता
सर्व अपादग्रस्त पशुपालकांना मदत मिळणार आहे.

मदतीचे तपशील असे👇

मृत दुधाळ जनावरासाठी 37,500 रुपये
ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी 32,000 रुपये
लहान जनावरांसाठी 20,000 रुपये
शेळी-मेंढीसाठी 4,000 रुपये
कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 रुपये

तसंच, पडझड झालेल्या गोठ्यांसाठी 3,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांना मोठा आधार मिळणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.