फुरसुंगी–वडकी रस्त्यावरील धक्कादायक प्रकार! अर्धवट लोखंडी पाईपमुळे वाहनांचे नुकसान, ठेकेदारावर कारवाईची मागणी

Rokhthok Maharashtra 30 0

फुरसुंगी खंडोबा माळ ते वडकी आणि पुढे सासवडकडे जाणारा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ऐन पावसाळ्यात या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट कामाला सुरुवात करण्यात आली. एका बाजूचे काम पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या बाजूला पाइपलाइनच्या व्हॉल्व्हसाठी असलेले लोखंडी पाईप अर्धवट कापून तसेच सोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या धारदार लोखंडी पाईपमुळे अनेक वाहनांच्या टायरचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात आवश्यकतेपेक्षा कमी स्टील वापरल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या शाळा आणि महाविद्यालये सुरू असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना चिखल, दलदल आणि खड्डेमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
संबंधित विभाग, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या कामाची पाहणी करून त्रुटी दूर कराव्यात, तसेच शासनाच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.