फॅमिली फंक्शनमधील केतनचा शेवटचा आनंदी VIDEO व्हायरल; आरोपी चेतनची ‘गेट ॲनालिसिस’ चाचणी

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात तपास वेगाने सुरू असतानाच आता केतनचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. कुटुंबासोबत आनंदाने नाचणारा केतन पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
स्क्रिप्ट :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये केतन अग्रवाल कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत एका फॅमिली फंक्शनमध्ये बेभान होऊन नाचताना दिसतो. या कार्यक्रमात सिया गोयलचे आई-वडीलही उपस्थित असल्याचे दिसत असून, हा व्हिडिओ अग्रवाल कुटुंबीयांनी शेअर केल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, केतनच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सिया गोयलच्या वर्तनाबाबत आणि तिच्या कथित अफेअरबाबत केतनने वारंवार चिंता व्यक्त केल्याचा उल्लेख केला आहे.
दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तसेच चेतन चौधरीची ‘गेट ॲनालिसिस’ चाचणी करण्यात येणार असून, लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमधील हालचालींशी त्याची तुलना केली जाणार आहे.
या बहुचर्चित हत्याकांडातील प्रत्येक नवीन खुलाशाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.