महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा भीषण अपघात! बक्षीस मिळालेल्या थारचा चक्काचूर

Rokhthok Maharashtra 1 0

 महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताब विजेता पैलवान Sikandar Shaikh याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सांगली जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे नागपूर-रत्नागिरी महामार्गावर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख कामानिमित्त सोलापूरकडे जात होता. विठ्ठलवाडी परिसरात त्याच्या थार गाडीने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
विशेष म्हणजे ही तीच थार गाडी आहे जी सिकंदर शेखला त्याच्या ऐतिहासिक महाराष्ट्र केसरी विजेतेपदानंतर बक्षीस म्हणून मिळाली होती.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सिकंदर शेखच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
गरीब परिस्थितीतून पुढे येत महाराष्ट्राचे नाव देशभर गाजवणाऱ्या सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीसह रुस्तम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकून इतिहास रचला आहे.
या घटनेनंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून सर्वजण त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.