येरवडा कारागृहात भक्तिरसाचा सोहळा; कीर्तनातून बंद्यांना सदाचाराचा संदेश

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यातील येरवडा खुले जिल्हा कारागृहात भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळा पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रासादिक कीर्तन कार्यक्रमाला बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. निलेश महाराज झरेगावकर यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव तसेच श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांद्वारे सदाचार, आत्मपरीक्षण आणि जीवनातील सकारात्मक बदलांचा संदेश दिला.
अभंग, गजर आणि संतविचारांनी संपूर्ण कारागृह परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. या कार्यक्रमात सुमारे 150 बंद्यांनी सहभाग घेतला.
कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी अशा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांच्या पुनर्वसनाला आणि मानसिक स्वास्थ्याला बळ मिळत असल्याचे सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.