हडपसरमध्ये PMC ची कारवाई वादात! 😡 “हप्ते नाही दिले म्हणून टार्गेट” व्यापाऱ्यांचा गंभीर आरोप

Rokhthok Maharashtra 2 0

हडपसरमध्ये पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची जोरदार कारवाई… आणि त्यानंतर व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.
पुणे महानगरपालिकाच्या पथकाने आकाशवाणी परिसरात अचानक धडक देत पथारी व्यवसायिकांचा माल टेम्पोमध्ये भरून जप्त केला.
मात्र, “आमच्याकडे परवाने असतानाही कारवाई केली जाते,” असा गंभीर आरोप व्यवसायिकांनी केला आहे.

इतकंच नाही… “हप्ते दिले नाहीत म्हणूनच आम्हाला टार्गेट केलं जातं,” असा थेट आरोप करत, काही अधिकाऱ्यांवर हप्तेगिरीचा घणाघात करण्यात आला आहे.
व्यवसायिकांच्या मते, अनधिकृत पथारीवाल्यांकडून नियमित हप्ते घेतले जातात… आणि कारवाईपूर्वीच त्यांना सूचना दिली जाते.
पण जे हप्ते देत नाहीत, त्यांच्यावरच कारवाई होते, असा संतप्त आरोप समोर आला आहे.
या कारवाईदरम्यान जप्त केलेला माल “खाजगी ठिकाणी नेला जातो,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
हडपसर परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि त्यामागील कथित भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे.
नागरिकांचा सवाल आहे—या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.