1000% नफ्याचे आमिष अन् 68 लाखांचा गंडा! सोलापूरच्या व्यापाऱ्याची मोठी सायबर फसवणूक

Rokhthok Maharashtra 3 0

“शेअर मार्केटमधून 1000 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष…
आणि सोलापूरच्या टेक्स्टाईल एजंटाची तब्बल 68 लाख रुपयांची फसवणूक!
सोलापूरमधील किरण कोटा यांना फेसबुकवर आयआयएफएल कॅपिटल लिमिटेडच्या नावाने जाहिरात दिसली.
त्यावर क्लिक करताच ते एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले गेले.
ग्रुपमधील टीना मल्होत्रा आणि इतरांनी ऑनलाइन ट्रेडिंग, डीएमए अकाउंट आणि मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवले.
फिर्यादीला शेअर मार्केटची माहिती असल्याने हे सर्व खरं वाटलं…
आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने लाखो रुपये गुंतवले.
20 दिवसांत अकाउंटमध्ये तब्बल 79 लाख रुपये आणि 29 लाखांचा नफा दाखवण्यात आला.
मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच रिक्वेस्ट रिजेक्ट झाली.
यानंतर विविध शुल्कांच्या नावाखाली आणखी पैसे घेतले गेले…
पण ना नफा मिळाला, ना मुद्दल परत!
सायबर गुन्हेगारांनी फेक लिंक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ही मोठी फसवणूक केल्याचं समोर आलं आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.