मित्राच्या मुलीलाच बनवलं वासनेचा शिकार: जालन्यातील माजी सरपंच फरार, चार महिन्यांची गरोदर

Rokhthok Maharashtra 12 0

एक धक्कादायक बातमी. जालना जिल्ह्यात एका माजी सरपंचाने आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवरच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पीडित केवळ १७ वर्षांची आहे. आरोपी नवनाथ आयंदे हा तिच्या वडिलांचा मित्र असून शेतात एकटी असल्याचा फायदा घेऊन त्याने पैशांचे आमिष दाखवले. तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिला चार महिन्यांचे गरोदर केले आहे. पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्यानंतर रुग्णालयात तपासणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले.

पालकांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी माजी सरपंच अजूनही फरार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.