20 मुलांना वाचवून कांचनबाईंचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 1 0

अंगणवाडी सेविकेचं अतुलनीय बलिदान—मधमाशांपासून मुलांना वाचवताना कांचनबाईंचा मृत्यू     

“अंगणवाडीत खेळणाऱ्या 20 लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी कांचनबाईंनी स्वतःचा जीव पणाला लावला अचानक मधमाशांचा मोठा थवा मुलांवर तुटून पडला…आणि कांचनबाईंनी क्षणाचाही विलंब न करता ताडपत्री आणि चटईत सगळी मुलं गुंडाळून सुरक्षित केलं.

 

मुलांचं रक्षण करत असताना शेकडो मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला…पण शेवटचं मूल वाचेपर्यंत त्या मागे हटल्या नाहीत. गावकरी धावून आले तेव्हा त्या बेशुद्ध पडल्या होत्या. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.कांचनबाई मेघवाल…
एका माऊलीसारख्या अंगणवाडी सेविकेचं
अतुलनीय बलिदान — सदैव स्मरणात.”**

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.