पुणे, दि.८ जुलै (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
मोक्याच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या सराईताला घरफोडीच्या गुन्ह्यात पुन्हा जेरबंद करण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पो.शि. अमित कांबळे व पो.ना.नाणेकर यांना माहिती मिळाली की घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी मांजरी भागात येणार असून त्याने अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. त्याअनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सापळा रचला असता आरोपी १) अर्जुनसिंग दुधाणी, रा.मांजरी बु. २) पापासिंग दुधानी, रा.बिराजदारनगर ३) पिल्लूूसिंग उर्फ कालूसिंग जुनी यांना सदर ठिकाणावरून पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दाखल गुन्ह्यातील एकूण २७.१५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक चांदिचे बिस्कीट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापैकी अर्जुनसिंग दुधाणी याचेवर सन २००३ पासुन पुणे शहर व हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याने त्याचे वर तळेगाव ढमढेरे पुणे येथे यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. सदर कामगिरी अपर पो.आयुक्त पूर्व प्रा.वि. नामदेव चव्हाण, पो.उपायुक्त परि-४ पंकज देशमुख, सहा.पो.आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनिल जाधव, पो.नि.गुन्हे सुनिल थोपटे, सहा.पो.नि.गजानन जाधव, पो.उपनि. विवेक रसाळ, सहा.पो.फौ.युसुफ पठाण, पो.ना.तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सचिन कळसाईत, पो.अंमलदार अमित कांबळे, सुभाष आव्हाड, विक्रांत सासवडकर यांनी केली.