पुणे

हडपसर : लोककल्याण प्रतिष्ठानकडून कै. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मदतीचा हात

स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येमुळे न्याय मिळणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मातापित्याला कायमस्वरूपी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी गंगानगर येथे बोलताना केले.
एमपीएससी पास होऊनही दोन वर्षे नियुक्तीपत्र मिळत नसल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने गंगानगर, फुरसुंगी या ठिकाणी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली,त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे हळहळ करत असताना लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी ५१ हजार रुपयांची मदत स्वप्नील लोणकर याचे आई वडील सुनील लोणकर आणि छाया लोणकर यांचे सांत्वन करत दिली,यावेळी राजाभाऊ होले हे बोलत होते.
यावेळी लोककल्याण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी,उपाध्यक्ष दिलीप भामे,सचिव विनोद सातव,कार्यकारिणी सदस्य प्रा. एस.टी पवार,इंद्रपाल हत्तरसंग,प्रभाकर शिंदे,चंद्रकांत वाघमारे,जनार्दन चव्हाण,प्रवीण होले,वैशाली होले,अरुणा लडकत,सुषमा सावळगी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
राजाभाऊ होले पुढे म्हणाले आयुष्यभराची कमाई,कर्ज लोणकर दाम्पंत्याने मुलाच्या शिक्षनासाठी खर्च केली पण या वयात त्यांचा आधार नियतीने हिरावून घेतला,या कुटुंबाला सात्वंना बरोबरच समाजाने आर्थिक आधार देण्याची गरज आहे. कै.स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येमुळे एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय मिळनार आहे,तरी याची जाणीव ठेवून स्वतःला स्वप्नील समजून या विद्यार्थ्यांनी त्याच्या आईवडीलाना कायमस्वरूपी मदतीचा हात द्यावा.
आमचा आधार असलेला मुलगा स्वप्नील याला गमावल्यानंतर आमच्यावर जी वेळ आली तशी वेळ कुणावरही यापुढे येऊ नये याकरिता राज्य शासनाने स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांवर दिरंगाई करून अन्याय करू नये आणि स्वप्नीलच्या जाण्याने कसलाच आधार नसलेल्या आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा यावेळी बोलताना लोणकर दाम्पत्याने व्यक्त केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x