पुणे

हडपसर मध्ये मोफत पंचगव्य आणि निसर्ग उपचार आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
स्मितसेवा फाउंडेशन, राजेश्वरी फाउंडेशन व ग्रामीण आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पंचगव्य आणि निसर्ग उपचार आरोग्य शिबिर व मोफत Diet Plan शिबिर हडपसर ससानेनगर परिसरात ठेवण्यात आले. यावेळी 120 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. स्वस्थ भारत पुन्हा आणण्यासाठी गाय व आयुर्वेद यांच्यावर काम करावे लागेल असे मत स्मितसेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ स्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केले. या शिबिरामध्ये गाय, गोमूत्र व आयुर्वेदाबद्दल महत्व सांगण्यात आली.

यावेळी श्री राजेन्द्रजी लुकंड (गौविज्ञान संस्था व Rss), माऊली तुपे (भारतीय किसान संघ अध्यक्ष महाराष्ट्र प्रांत व जनमित्र संघटना), मारुती आबा तुपे (नगरसेवक), भूषण तुपे (पुणे शहर उपाध्यक्ष भाजपा), गणेश घुले (संघटन सरचिटणीस हडपसर विधानसभा), अभिजित बोराटे (हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष), डॉ. अशोक सोरगावि, राजू महाडिक, अमोल दुगाने, दिलीप मोरे, प्रवीण टिळेकर, प्रकाश यादव, हनुमंत टिळेकर, स्वातीताई कुरणे (भाजपा हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा), सीमाताई शेंडे (भाजपा ओबीसी मोर्चा महिला आघाडी अध्यक्षा), विजयाताई वाडकर (भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा), सविता हिंगणे (भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षा भाजपा हडपसर विधानसभा), शोभाताई लगड, मनीषाताई राऊत, कु. आशाताई हिंगणे उपस्थित होते.
गणेश रासगे व युवक मित्र मंडळाच्या सदस्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.

डॉ. कीर्ति कुलकर्णी, डॉ. अजित जगताप, गव्यसिद्ध उमेश जांभळे, डॉ. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला..

यावेळी स्मितसेवा फौंडेशन चे सदस्य श्री गणेश डांगमाळी, सागर पवार, संगीता पाटील, नूतन पासलकर, अपर्णा बाजारमठ, आरती कांबळे, ललिता चिल्लाळ, शर्मिला डांगमाळी, सुनिता पाटील, सौ विजया भूमकर, रूपाली पाटील, सोनल जैन, अश्विनी ताडे, सुवर्णा कानडे, निर्मला वाडकर, स्वाती आल्हाट यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमाचे संयोजन स्मिता तुषार गायकवाड यांनी केले. सुजाता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व सौ संगीता बोराटे यांनी आभार मानले.