पुणे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

पुणे दि. 17 : भारत विकास परिषद पुणे यांच्यावतीने शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती संयंत्राचे (ऑक्सिजन प्रकल्प) लोकार्पण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,भारत विकास परिषदेचे श्यामजी शर्मा, दत्तात्रय चितळे, राजेंद्र जोग, रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त गोपाळ राठी, मंदार जोग आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. कोश्यारी म्हणाले, भारत विकास परिषद व शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक रुग्णालय सेवाभावी वृत्तीने सामान्य जनतेची सेवा करण्याचे काम करत आहे. संकट काळात भारत विकास परिषद व शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक रुग्णालयाचे काम प्रशंसनीय आहे. समाज विकासीत होत असताना समस्या वाढत आहेत आणि त्या समस्यांचे समाधानही अशा चांगल्या उपक्रमातून होत आहे. गरीब, पिडीत, दु:खी लोकांची सेवा करणे हीच खरी समाजसेवा आहे. आणि अशी सेवा करत आपण पुढे जायचे आहे. कोरोना काळात सेवाकार्यासाठी अनेक हात पुढे आल्याने या संकटाचा सामना करणे शक्य झाले, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.