महाराष्ट्र

पिककर्जाचा पासून सलग तीन वर्षांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्याला अँड प्रमोद तौर यांच्या मुळे मिळाले पिककर्ज

माजलगा तालुक्यातील गुंजथडी येथील शेतकरी बालासाहेब बाबुराव नायबळ यांना मनघडीत विविध सबबीखाली माजलगाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक पिककर्ज देण्यास तब्बल तिन वर्षापासून टाळाटाळ करत होते ..
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगाव तालुका सरचिटणीस अँड प्रमोद तौर बँक व्यवस्थापकाची भेट घेऊन ,प्रत्यक्ष सदर शेतकरी यांच्या सह पिककर्ज मिळण्या बाबत तसेच बँक व्यवस्थापना च्या ढिसाळ कारभाराला त्रस्त असलेल्या ईतर शेतकरी यांच्या पिककर्जा बाबतच्या समस्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक , तहसीलदार , शेतकरी बांधव व बँक व्यवस्थापन यांच्या समन्वयाने आर्धा तास चर्चा करून सोडवल्या .
शेतकरी बालासाहेब नायबळ यांना उद्या पिककर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे स्विकारुन तात्काळ पिककर्ज दिले जाईल याची हमी बँक व्यवस्थापक यांनी दिली
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष वसंत परसे , अभिमन्यु नायबळ , अरुण जाधव , सतिष जाधव , सोपान ठाकरे , आदी शेतकरी उपस्थित होते