पाकिस्तानला जाणाऱ्या नद्यांचं पाणी रोखनार – नितीन गडकरी
केंद्रीय नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. येत्या काळात पाकिस्तानला जाणारे पाणी भारत रोखू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर सिंधु जल कराराअंतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी रोखावे या मागणीने जोर धरला आहे. व्यास, रावी आणि सतलज नंदीचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते. पाकिस्तानला दिले जात असलेल्या तीन नद्यांचे पाणी भारत रोखेल. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी वणवण होईल. तीन नद्यातील पाणी प्रकल्पाद्वारे पाकिस्तान ऐवजी यमुना नदीत सोडले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे होते असा आरोप काँग्रेसने केला आहे.
