पुणेमहाराष्ट्रहवेली

चित्तरंजन गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैद्य, जातीचे प्रमाण पत्र रद्द झाल्याने कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीचे लोकं नियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांना मोठा धक्का

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध केले आहे. त्यांमुळे गायकवाड यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे. हे आदेश अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिले आहे.

 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून सरपंचपदासाठी उभे राहिले होते. मात्र कल्पना बाबासाहेब काळभोर, प्रीतम भास्कर काळभोर व ऋषिकेश विद्याधर काळभोर यांनी यावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती .

 

चित्तरंजन गायकवाड यांचा कुणबी (83) (इतर मागास वर्ग ) जातीदावा अमान्य करण्यात येत असून सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा पारनेर (जि. अहमदनगर) यांनी निर्गमित केलेले कुणबी या जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. ते जातीचे प्रमाणपत्र जप्त करण्यात येणार आहे.