मुंबई-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या वाढणा-या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढलेला असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जनतेसाठी माणुसकीचा धर्म बजावत आहेत .अडचणीत असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू जेवण देण्यासह त्यांनी आपल्या घरी जाऊ न शकलेल्या जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना 15 एप्रिल पासून आपल्या घरात आसरा दिला आहे
धुमधडाका या चित्रपटासह अनेक मराठी चित्रपटात आघाडीच्या नायिका म्हणून भूमिका साकारलेल्या कोकणातील कन्या ऐश्वर्या राणे या सध्या एकाकी असून त्या सिंधुदुर्ग येथे आपल्या गावाकडे निघाल्या असता कोकणातील अर्ध्या वाटेवरच पोलीसांनी त्यांना अडवून पुन्हा मुंबई कडे जाण्याचे आदेश दिले.
मुंबई आणि महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागल्यापासून आठवले हे वांद्रे येथील संविधान या आपल्या बंगल्यावर गरजू नागरीकांसाठी नित्यनेमाने अन्नधान्य वाटप आणि जेवणाची व्यवस्था करीत आहेत. ऐश्वर्या राणे या परत दिनांक 15एप्रिल रोजी मुंबईला परतल्यानंतर त्यांनी आठवले यांची भेट घेवून सर्व परीस्थिती कथन केली असता त्यांनी राणे यांना स्वतःच्या घरात थांबवून घेतले जोपर्यंत लाॅकडाऊन उठत नाही तोपर्यंत आपलेच घर समजून रहावे अशी ग्वाहीदेखील आठवले यांनी त्यांना दिली.दरम्यान परतीच्या प्रवासात राणे यांचे सर्व सामान कपडे चोरीस गेल्यामुळे बंगल्यावर राहत असलेल्या राणे या सीमाताई आठवले यांनी आपल्याकडील कपडेही दिले असून आपण आठवले यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून या ठिकाणी राहत असल्याचे राणे यांनी सांगितले. सिंधु दुर्ग येथे रहावयास स्वतःचे छोटेसे घर मिळावे यासाठी आपली विनंती असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान लाॅकडाऊन व कोरोनासारख्या कठीण प्रसंगात आठवले यांनी दाखवलेल्या माणुसकीच्या धर्माची सर्वत्र चर्चा होत आहे.
रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा माणुसकीचा धर्म ; ज्येष्ठ अभिनेत्रीला दिला आपल्या घरात आसरा
Related tags :
Subscribe
Login
0 Comments