हवेली

आम्ही पोलीस आहे सांगून टँकरचालकाचे अपहरण करून अडीच लाख रुपये खंडणी घेण्याचा प्रकार आला उघडकीस

ता.हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

दोन जणांनी टँकरचालकाचे अपहरण करून, डांबुन ठेवून आम्ही पोलीस आहोत तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. असे सांगून अडीच लाख रुपये खंडणी घेऊन झाला प्रकार कोणाला सांगितला तर तुझा टँकर कसा चालतो ते बघातोच अशी धमकी दिल्याचा प्रकार पुणे नगर महामार्गावर झाला आहे. याप्रकरणी संबंधिताविरूध्द तातडीने गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अर्जाद्वारे टँकरचालकाने पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण अभिनव देशमुख यांचेकडे केली आहे.
महेंद्र रामदास गरूड वयः २९, रा. चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर) यांनी दिलेल्या अर्जानुसार ९ फेब्रुवारी रोजी ते टँकर क्रमांक एमएच १२ आरएन ३८३८ घेऊन क्लिनर ज्ञानेश्वर माळी सोबत लोणी काळभोर येथून कोरेगाव भिमा येथे डिझेल खाली करण्यासाठी पुणे नगर रोडने कोरेगाव भिमा येथे आले. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारांस डिंग्रजवाडी फाटयाच्या पुढे पाठीमागून एक लाल रंगाची ब्रिझा एमएच २३ एडी ८५९५ आली व टँकरला आडवी लावून टँकर थांबविण्यास भाग पाडले. ब्रिझा मधून निळया रंगाची पँट व पांढरा शर्ट तसेच त्यावरती फिकट निळसर रंगाचे जॅकेट घातलेला एकजण उतरला त्याने होते. सदरचा इसम टँकर जवळ आला. क्लिनरला टँकरखाली उतरविले व टँकरमध्ये येवून मी पोलीस आहे ब्रिझामध्ये मोठे साहेब बसले आहेत गाडी पोलीस स्टेशनला घे असे म्हणाला. त्यानंतर टँकर सणसवाडी हद्दीतील कल्पेस वेब ब्रिज पाठीमागील मोकळया मैदानात लावण्यास सांगितले. त्यानंतर ब्रिझामधील साध्या वेशातील कथित मोठ्या साहेबांनी गरूड यांना मेव्हणे दिंगबर जालींदर शितोळे यांस कॉल कर व पाच लाख रूपये तात्काळ घेवून शिक्रापुर येथे ये अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करीन असे सांगितले.
त्यानंतर गरूड दोघांचे सांगणेप्रमाणे टँकर चाकण चौक शिक्रापूर येथे आणला असता त्यांनी पोलीस स्टेशनला न घेता तो हायवे किंग पेट्रोल पंप येथे लावला. त्यानंतर अंदाजे २० मिनीटांनी मोठे साहेब हे पांढऱ्या रंगाची आरटिगा कार क्रमांक एमएच ०२ सीझेड ७०३० मधून आले. गरूड यांना जबरदस्तीने आरटिगा कारमध्ये बसविले. मलठण फाटा येथील संजिवनी हॉस्पिटलचे जवळ गाडी थांबवली तेथे मेव्हणे शितोळे आले. त्यांचेकडून अडीच लाख घेतले. व झाला प्रकार जर का कोणाला सांगितला तर तुझा टँकर कसा चालतो ते बघातोच अशी धमकी देवून ते निघून गेले.
यामुळे गरूड यांनी सदर बाबतीत धमकी देण्यात आलेने आपल्यासह मेव्हण्याच्या जिवितास धोका असून सदर गुन्हेगार खरे च पोलीस आहेत की बोगस याचा तपास लावावा अशी विनंती अर्जाद्वारे पोलीस अधीक्षकांना केली आहे.