पुणे

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे मिनिर्व्हा कार्निव्हल २०२३ या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेमध्ये यश

पुण्यातील आय.एस.बी.एम. युनिव्हर्सिटी मध्ये घेतल्या गेलेल्या मिनिर्व्हा कार्निव्हल २०२३ जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पारितोषिके मिळवून अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने एक विक्रम केला. यामध्ये भारतीय पारंपरिक लावणी मध्ये वैयक्तिक प्रथम पारितोषिक मानसी ढमढेरे ह्या मुलीने मिळवले तसेच हिप-हॉप वैयक्तिक मध्ये प्रशांत लोखंडे यांनी देखील प्रथम पारितोषिक मिळवले याचबरोबर एकपात्री अभिनयात सिद्धार्थ मानुरकर याने पारितोषिक मिळवले.

तसेच मुकनाट्य मध्ये सांघिक द्वितीय पारितोषिक मिळवले ज्यामध्ये सहभागी दर्शक सागडे,अनिकेत जगताप, तुषार खंडागळे, तन्मय क्षिरसागर, रोहित शिंदे, सृष्टि जाधव, नितीन देडे, पूनम होळसंबरे इत्यादी स्पर्धक होते याचबरोबर पथनाट्य या मध्ये प्रथम पारितोषिक देखील मिळवले यामध्ये दर्शक सागडे,अनिकेत जगताप, तुषार खंडागळे, तन्मय क्षिरसागर, सृष्टी जाधव, नितीन देडे, आर्या गळांगे, कोमल उकिरडे, मयुरी खर्चे,ओम महामुनी इत्यादी स्पर्धक सहभागी होते.

 

या सर्व स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवून अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिनिर्व्हा करंडक जिंकला. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ राजेश रसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे विद्यार्थ्यांनचे कौतुक केले.