पुणेमुंबई

बिग ब्रेकिंग न्युज….. हडपसर चे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्या व्यासपीठावर – हडपसर पदाधिकारी अजित पवारांच्या गटात – मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”

पुणे (अनिल मोरे )

 हडपसर विधानसभा मतदारसंघातील नेते व पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत तर विद्यमान आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्या बैठकीत व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मतदारसंघात दुफळी निर्माण झाली आहे, या घडामोडीत कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या बाजूने कोण आहे यासाठी बैठका बोलावल्या आहेत आपल्या बाजूने कोण नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत यातून तपासले जाणार आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते व पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात सामील झाले यामध्ये प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रदेश सरचिटणीस माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, संदीप बधे यांच्यासह अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

 हडपसर मतदार संघाचे विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील दोन दिवस नॉटरीचेबल होते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की आमदार कोणत्या गटात जाणार? आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्या  व्यासपीठावर आजच्या बैठकीला उपस्थित झाल्याने ते शरद पवार यांच्याबरोबरच राहतील अशी खात्रीशीर माहिती समोर येत आहे जर असे झाले तर हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठे दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे, पक्षीय कार्यकारणी व जास्तीत जास्त माजी नगरसेवक अजित पवार यांच्या गटात तर काही पदाधिकारी व आमदार शरद पवार यांच्या गटात सामील होतील पुढील दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.