पुणे

” रस्त्यावरील अपघात : द्या माणुसकीचा हात ” पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचा उपक्रम

 

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
1 मे रोजी असणाऱ्या महाराष्ट्र ऑर्थोपेडिक डे च्या निम्मित्ताने पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीने काही कार्यक्रमांचे नियोजन केले आहे .
रस्त्यावरील अपघात : द्या माणुसकीचा हात हि या वर्षीची थीम आहे .
जगभरात दर मिनिटाला 90 व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडतात आणि दरवर्षी साधारण 59 लाख .
हा दरवर्षी हा आकडा वाढतच आहे .
भारतासारख्या ठिकाणी जिथे अपघातस्थळी द्यायच्या उपचार अन तिथून रुग्ण हॉस्पिटल ला शिफ्ट करण्याची सुविधा यांचा दर्जा तितकासा चांगला नाही त्यामुळं आपल्याकडं होणारे मृत्यूचे प्रमाण भयावह आहे . हे मृत्यू सहज टाळता येण्यासारखे आहेत .
आपल्याकडं रस्त्यावर जेंव्हा अपघात होतो आणि कोणीतरी जखमी होते तेंव्हा बघ्यांची गर्दी होते .
काहीजण सेल्फी, फोटो काढतात तर काही जण दुसऱ्या ड्रायवर ला धरून मारण्यात धन्यता मानतात. बरेच नागरिक इच्छा असूनही पोलीस कोर्ट कचेरी यांच्या भीतीने पुढे येऊन मदत करत नाहीत.
असोसिएशन च्या माध्यमातून आम्ही त्याना हाच संदेश देऊ इच्छितो कि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मदत करणाऱ्या अशा कोणत्याही नागरिकास पोलीस वेठीस धरू शकत नाहीत अथवा पोलीस चौकीत येण्यासाठी आग्रह करू शकत नाहीत .
याउलट पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीतील हॉस्पिटल या नागरिकांचे कौतुकच करतील .
याविषयी नागरिकांची जन जागृती करण्यासाठी आणि अपघातस्थळी करायचे प्रथमोपचार शिकवण्यासाठी पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती येथे कार्यक्रम घेण्यात येणार आहे .
अशी माहिती पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शिंत्रे आणि सचिव डॉक्टर संजय पाटील यांनी दिली

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Hі theгe to every , aѕ I am truly eager of reading this blog’s
pօst to be updatеd oon a regular basіѕ.
It cօntains pleaѕant material. https://golatex.de/wiki/index.php/Mesin_Bocoran_Link_Slot_Gacor_Hari_Batman_Darkish_Knight_Terbaru

2 months ago

Thanks for every other informative site. Where else may just I
get that kind of information written in such a perfect approach?

I’ve a project that I am simply now running on, and I have been at the look out for such info.

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x