पुणे

“हडपसर येथे चोऱ्या करून थैमान घालणाऱ्या अहमदनगरच्या टोळीवर मोक्का : कुख्यात शेलार व तीन साथीदारांविरुद्ध आयुक्तांची कारवाई”

पुणे CRIME NEWS : हडपसर भागात दरोडा, जबरी चोरी सारख्या गुन्ह्यांसाठी कुख्यात झालेल्या ‘नगरी’ टोळीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्क्याचा दणका दिला आहे. पोलीस आयुक्तांची सलग ३८वी मोक्का कारवाई आहे.

दरोडा, जबरी चोरी, चैन चोरी सारखे गंभीर गुन्हे करणारे आंतर जिल्हा टोळीतील अमोल भास्कर शेलार (टोळी प्रमुख) व त्याचे तीन साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी (१) अमोल भास्कर शेलार वय २५ वर्षे रा. नेवासा फाटा, मुंकिदनगरट बजरंगनगर नेवासा अहमदनगर, (टोळी प्रमुख) (२) स्वप्नील ऊर्फ भावडया ईश्वर केंदळे वय २९ वर्षे रा. संभाजीनगर, नेवासा, अहमदनगर (टोळी सदस्य ) (३) अमर चिल्लु कांबळे वय अंदाजे ३५ वर्षे रा. मुकिदनगर, नेवासा, अहमदनगर (टोळी सदस्य ) (४) विजय रामकृष्ण देडगावकर वय ६३ वर्षे रा. मु.पो. कोल्हार ता. राहता जि. अहमदनगर (सोनार रिसीव्हर) अशी टोळी सदस्यांची नावे आहेत.

 

दि. २०/०६/२०२३ रोजी सकाळी मार्निंग वॉक करुन फिर्यादी राहते घराचे समोर पार्कीगमध्ये आले असताना तीन अनोळखी इसम एका दुचाकीवरुन त्यांच्या जवळ येवुन त्यांना पत्ता विचारत असताना सदर मोटार सायकलवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याची मनीमाळ जबरदस्तीने हिसका मारुन निघुन गेले त्यावरून हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९०२ / २०२३ भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता…

दाखल गुन्ह्याचा तपास करता दाखल गुन्हा हा दरोडा, जबरी चोरी, चैन चोरी सारखे गंभीर गुन्हे करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार अमोल भास्कर शेलार व त्याचे टोळीतील सदस्य यांनी केलेचे निष्पन्न झाले. त्यावरुन यातील अटक आरोपी (१) अमोल भास्कर शेलार वय २५ वर्षे रा. नेवासा फाटा, मुंकिदनगरट बजरंगनगर नेवासा अहमदनगर, (टोळी प्रमुख) (२) स्वप्नील ऊर्फ भावडया ईश्वर केंदळे वय २९ वर्षे रा. संभाजीनगर, नेवासा, अहमदनगर (टोळी सदस्य ) (३) अमर चिल्लु कांबळे वय अंदाजे ३५ वर्षे रा. मुकिदनगर, नेवासा, अहमदनगर (टोळी सदस्य ) (४) विजय रामकृष्ण देडगावकर वय ६३ वर्षे रा. मु.पो. कोल्हार ता. राहता जि. अहमदनगर (सोनार रिसीव्हर) (टोळी सदस्य) या आरोपींनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व रहावे म्हणुन व अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे इतर फायद्याकरीता सदरचा गुन्हा केलेचे दिसुन आलेने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

 

सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ९०२/२०२३ भादंवि कलम ३९२. ३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii)३ (२) ३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुका पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्रीमती अश्विनी राख-केदार हया करीत आहेत.