पुणे

“अतिरेकी कारवाई घटनेच्या अनुषंगाने, उत्सव सावधपणे साजरे करा – रंजनकुमार शर्मा” “हडपसर मध्ये दहीहंडी – गणेशोत्सव पूर्वनियोजित बैठक संपन्न”

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राज्यातील मोठे शहर अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गेट असतात त्यामध्ये पुण्यामध्ये काही गुन्हेगार सापडले आहेत, त्यामुळे सांस्कृतिक उत्सव साजरे करता सावधानता बाळगावी जेणेकरून अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी गणेश मंडळानी दक्षता घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले.

दहीहंडी व गणेशोत्सवच्या पार्शभूमीवर महापालिकेच्या येथील कै.रामचंद्र बनकर शाळेत पूर्वनियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसरचे महाराष्ट्र पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, मुंढवाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, नंबर वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, मुंढवा वाहतूक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, महापालिका हडपसर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सण साजरे करत असताना नागरिक व पोलीस प्रशासन यांच्यात ताळमेळ असला पाहिजे, नियमांचे काटेकोर पालन केले जावे, अपघात होणार नाही याची दक्षता मंडळानी घ्यावी रस्त्यावर उत्सव साजरे करताना वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले.
सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी केले सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांनी प्रास्ताविक केले.
बैठकी प्रसंगी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, सुनील बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, ईशान तुपे, प्रशांत सुरसे, संजय हरपळे, आदींसह महिला दक्षता समिती सदस्य, शांतता कमिटी सदस्य व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील गणपती मंडळानी नियमांचे पालन करावे, डीजे लावू नयेत तसेच धर्मादाय आयुक्तांकडे मंडळाची नोंदणी करावी, रस्त्याला अडथळे होऊ नये याची दक्षता घ्यावी उत्सवाचे पावित्र्य भंग होणार नाही याची दक्षता पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.
रविंद्र शेळके
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर