पुणेमहाराष्ट्र

नातेवाईक तरुण मुलीवर अत्याचार करून,व्हिडीओ काढून 30 लाख उकळले….!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला तसेच त्या घटनेचा व्हिडिओ काढून तिच्याकडून 30 लाख रुपये उकळले असा तरुणीने आरोप केला आहे. ही घटना काल पुण्यातील मुंढवा येथे घडली आहे. मुलगी आरोपीच्या नात्यातील असून ती अल्पवयींन असल्यामुळे तसेच मुलीवर अत्याचार करताना त्याचे चित्रीकरण करून धमकावून 30 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तरुणासह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन असताना देखील नात्यातील मुलीवर अत्याचार केले आणि त्याचे चित्रीकरण करून धमकावून 30 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत 17 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणासह त्याची आई, वडील,आणि त्याची मावस बहिण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुण व तरुणी नातेवाईक आहेत. ती अल्पवयीन असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. त्याचे चित्रीकरण काढले.

याबाबत तिने तरुणाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली. त्यानंतर हे फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देऊन तरुणाने तिला धमकावून अत्याचार केले.तरुणीने बदनामीच्या भीतीने तरुणीने घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवले तसेच मुदतठेव मोडून 30 लाख रुपये जमा केले . ही रक्कम तिने तरुणाच्या बँक खात्यावर पाठविली. त्यानंतरही आरोपी तरुण तिला धमकावत होता.तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.