पुणे

मुस्तीकरांच योगदान विसरता येणार नाही – राहूल किर्लोस्कर, कृतार्थ या गौरव ग्रंथाचा प्रकाशन समारंभ

आपल्या दुरदृष्टीतून शंभर कोटी रुपयाचे प्रॉफिट टारगेट मुस्तीकरांनी सेट केले ते आम्ही नुकतेच पूर्ण केले त्यामागील योगदान आम्ही कधीच विसरणार नाही असे मत किर्लोस्कर न्यूमॅटिकचे चेअरमन राहूल किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.

किर्लोस्कर न्यूमॅटिकचे माजी व्यवस्थापकीय संचालक हरी मुस्तीकर यांच्या 78 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कृतार्थ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात राहूल किर्लोस्कर बोलत होते. या प्रसंगी हरी मुस्तीकर यांच्या नावाच्या टपाल टिकीटाचे प्रकाशन राहूल किर्लोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी डॉ.बाबामहाराज तराणेकर, मा.आमदार उल्हास पवार, हरी मुस्तीकर, सौ.मुस्तीकर, विलास बाबर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

फरीदाबाद स्थित केजी खोसला कंपनी आम्ही विकत घेतली. ती चालवणे महाराष्ट्रीयण कंपन्याला शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर तेथील आठशे लोकांना एकाच दिवशी गोल्डन हँडसेक देऊन मुस्तीकरानी ती कंपनी पुण्याला शिफ्ट केली. ते खूपच धाडसी आणि महत्त्वाचे पाऊल होते. असाही उल्लेख राहुल किर्लोस्करांनी भाषणात केला. मुस्तीकरांनी औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असताना अध्यात्माची कास सुध्दा जोडली त्यामुळे त्यांना माणसे जोडण्याची कला चांगली अवगत झाली असे मत डॉ. तराणेकर यांनी व्यक्त केले तर उल्हास पवार म्हणाले मी आणि हरी मुस्तीकर त्रिपदी परिवारात सातत्याने भेटत त्यामुळे त्यांच्या विविध क्षेत्रातील नैपुण्य मला पहायला मिळाले.

 

या भावनिक कार्यक्रमामुळे मी भारावून गेलो आहे. किर्लोस्कर न्यूमॅटिकच्या यशामध्ये राहूल किर्लोस्कर यांनी मला वेळोवेळी दिलेले सहकार्य व साथ हो मोलाची होती. वेळ प्रसंगी माझ्या बरोबर येवून मला प्रोत्साहन देत त्यामुळे कठीण प्रसंगातून आम्ही यश प्राप्त करत गेलो. तसेच आपण सर्वांनी मला वेळोवेळी साथ दिली त्यामुळे यशस्वी झालो हे मी विसरू शकत नाही असे उद्गार हरी मुस्तीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

 

प्रास्ताविक कृतार्थ या गौरव ग्रंथाचे कार्यकारी संपादक विलास बाबर यांनी केले. मानपत्राचे वाचन विजय घमंडे यांनी केले,सूत्रसंचालन पटवर्धन यांनी केले तर आभार मिलिंद मुस्तीकर यांनी मानले.